अजित पवारांचे 'फायरब्रँड' नेते अमोल मिटकरी होणार गृहमंत्री

Kolhapur news
By -

 


        


     मुंबई : अमोल मिटकरी लवकरच 'गृहमंत्र्यां'च्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, ही 'भूमिका' राजकारणाच्या 'रियल लाईफ'मधली नाही. तर ही भूमिका आहे चित्रपटाच्या 'रिल लाईफ'मधली. अमोल मिटकरी  लवकरच एका मराठी चित्रपटात गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच येऊ घातलेल्या 'बिल्लोरी' या मराठी चित्रपटात अमोल मिटकरी गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटात आप्पासाहेब पाटील ही गृहमंत्र्यांची भूमिका साकारत आहेत. सदगृरु इंटरप्राजेस' निर्मित हा चित्रपट असून याचे निर्माते प्रशांत मानकर तर दिग्दर्शक सुनिल शिरसाठ आहेत.
 

 
अमोल मिटकरी राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादीची तोफ, अजित पवारांचा 'फायरब्रँड' नेता, कधीकाळी राज्यात शिवव्याख्याते अशी ओळख असलेल्या अमोल मिटकरींना मे 2020 मध्ये अजितदादांनी रातोरात विधानपरिषदेचा आमदार करीत खळबळ उडवून दिली होती. अमोल मिटकरींना लागलेल्या आमदारकीच्या 'लॉटरी'ने भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून सोडलं होतं. त्यानंतर आमदार अमोल मिटकरींनी सभागृहात, सभागृहाबाहेर, सभेच्या फडात अन् टीव्हीवरील चर्चेच आपल्या वक्तृत्वाची मोहोर उमटवली. महाविकास आघाडी अन नंतरच्या महायुतीच्या सरकारच्या काळात मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत मिटकरींचं नाव चर्चेत यायला लागलं. 2024 मध्ये विधानसभेचे निकाल लागल्यानंतर त्यांचं नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीतही चर्चेत आलं. मात्र, आमदार मिटकरी इतर संभाव्य दावेंदारांसारखे 'वेटींग'वरच राहिलेत. मात्र, आज अमोल मिटकरींचं नशीब फळफळलंय. अन त्यांना थेट राज्याचं गृहमंत्रीपद मिळालं आहे. मात्र, ही 'भूमिका' राजकारणाच्या 'रियल लाईफ'मधली नाही. तर ही भूमिका आहेय चित्रपटाच्या 'रिल लाईफ'मधली. अमोल मिटकरी लवकरच 'बिल्लोरी' या मराठी चित्रपटात राज्याच्या गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटात आप्पासाहेब पाटील ही गृहमंत्र्यांनी भूमिका साकारत आहेत. 

   
        ----------------------------------