राष्ट्रवादीच्या नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न : खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

Kolhapur news
By -

 

                 


   सांगली : येथे माजी महापौर सुरेश पाटील  यांनी काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ते जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सांगली जिल्ह्यात त्यांची ओळख होती. ते सद्या अजित पवार गटात प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी आहेत. गेल्या 30 ते 40 वर्षापासून ते राजकारणात सक्रिय सहभागी आहेत. अशातच सुरेश पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने आता सांगलीत खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. राहत्या घरी साडीने गळफास लावून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.


      नगरसेवक ते महापौर..


साधा कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असा प्रवास सुरेश पाटील यांचा राहिला आहे. त्यांच्या आत्महत्याच्या प्रयत्नामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .सांगलीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे. या घटनेची नोंद सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


      राजकारणात आदराचे स्थान


सुरेश पाटील हे गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून सांगलीच्या राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणासह व्यापार, शिक्षणक्षेत्र आणि समाजकारणात सुरेश पाटील यांना आदराचे स्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरेश पाटील राजकारण तसेच सार्वजनिक कार्यक्रमांपासून अलिप्त राहत होते. गेल्या रविवारी त्यांच्याच संकल्पनेतून सुरू झालेल्या सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला ते उपस्थित होते. त्यानंतर सोमवारी त्यांनी नेमीनाथनगर येथील त्यांच्या निवासस्थानी साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला . 

          


    

        -----------------------------------