दाेन IAS अधिकाऱ्यांनी केला IPS बिरदेव डोणे यांचा सत्कार

Kolhapur news
By -

           




             कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव डोणे या तरुणाने नुकतेच कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत, त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वी रँक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले. या यशाबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिकृती त्यांना भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली.


कार्यक्रमावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी बिरदेव डोणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, ‘चांगले मित्र बनवा, व्यसनांपासून दूर राहा आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा. माझ्या यशामागे केवळ कष्ट नव्हे तर जिद्दही होती.’ शेवटी, त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


      -----------------------------