महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर

Kolhapur news
By -

    

             



             कोल्हापूर न्यूज नेटवर्क


       १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम, कोल्हापूर येथे   पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. 


संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांच्या त्यागाचं स्मरण करून त्यांना अभिवादन केले. महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा  यावेळी देण्यात आल्या. 


आजचा दिवस म्हणजे राज्याच्या प्रगतीची नवी दिशा ठरवण्याचा संकल्प करण्याचा दिवस. राज्यातील जनतेच्या निरोगी आयुष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त  के.मंजुलक्ष्मी, महापालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता. गुणवंत विद्यार्थ्यांचा व  उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. 









      ----------------------