जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचे शुक्रवारी हल्ला बोल आंदोलन

Kolhapur news
By -

              


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 

काेल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या समन्वयाने एम एस सी ई आर टी चे संचालक राहुल रेखावार यांच्या लष्करी शिस्ती विराेधात व असंवेदनशील धोरणांविरोधात हल्ला बोल आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे शुक्रवार दि.१३ जून रोजी सकाळी ११ वाजता  केले जाणार आहे


  राज्यातील वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी निघालेल्या शिक्षकांच्या गाडीला रत्नागिरी येथे  झालेल्या अपघातामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असताना संचालक रेखावर यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया जखमेवर मीठ चोळणारे आहे.

 

वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणात ट्राफिक जाम तसेच मेडिकल कारणास्तव किंवा पाऊसा सारख्या नैसर्गिक आपती मुळे प्रशिक्षण ठिकाणी पोहचण्यासाठी थोडा उशीर झाल्यास शिक्षकांना प्रशिक्षणातून ऑन लाईन स्वरूपातून बाहेर काढणे तसेच त्यांची अमानवीय लष्करी शिस्त अशा आक्षेपार्ह बाबींवर आक्रोश व्यक्त करण्यासाठी व प्रशिक्षणास अनुपस्थित कालावधी माफ करून प्रशिक्षण पूर्ण करू द्यावे अशा न्याय मागण्यांसाठी शुक्रवार दिनांक १३ जून २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे तीव्र निदर्शन आंदोलन आयोजित करण्यात केले आहे .


 कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक व सर्व जिल्हा परिषद, म.न.पा., व खाजगी प्राथमिक/माध्यमिक ,उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी  करण्याचे आवाहन  सर्व प्राथमिक/माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर संघटना समन्वय समिती कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ  यांच्या वतीने करण्यात आले आहे. 


             --------------------------