कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागलच्या सर पिराजीराव पतसंस्थेचे कार्य आदर्शवत असल्यामुळे इतरांसाठी ते प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन कागलच्या गटशिक्षणाधिकारी सारिका कासाेटे यांनी केले.
कागल तालुका शिक्षण सेवक संघ अर्थात सीमाभाग शिक्षक संघटनेच्या वतीने सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन प्रदीप बुधाळे पाटील , सर्व संचालक मंडळ यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मच्छिंद्र निकाडे होते.
सीमाभाग संघटनेचे नेते सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढी कागलचे विद्यमान चेअरमन प्रदिप बुधाळे पाटील ,व्हा चेअरमन विठ्ठल पाटील व सर्व संचालक मंडळ, शाहू शिक्षक आघाडी कागलची सर्व सुकाणू समिती, सीमाभाग शिक्षक संघटनेची सर्व सुकाणू समिती व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत त्यांचा यथोच्छित सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून बुधाळे पाटील सर यांच्या परिवारा मार्फत उपस्थित सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कागल तालुक्याच्या कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी सौ सारिका कासोटे मॅडम, शाहू शिक्षक आघाडीचे कागल चे अध्यक्ष व जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी कोल्हापूरचे विद्यमान चेअरमन सुनील पाटील सर, कोल्हापूर प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक बाळासाहेब निंबाळकर उपस्थित होते.
सीमाभाग शिक्षक नेते मोहन पाटील , सीमाभाग शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एल डी पाटील सर,संघटनेचे कार्यकारणी सदस्य, सेवानिवृत सदस्य, प्रदीप बुधाळे पाटील यांचे सर्व स्नेही व मित्रमंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत सुरेश खोत सर, प्रास्ताविक एल. डी. पाटील सर यांनी केले. सर्वांचे आभार सौ. नूतन सकट यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. अश्विनी कुंभार मॅडम व सौ शबाना मुजावर मॅडम यांनी केले.
---------------