देवेंद्रजी ,गुटख्याला मोका लावण्याचा निर्णय फारच चांगला. आधी अजय आणि शारुखला उचला

Kolhapur news
By -

           



            कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा रथ हाकण्यासाठी कसली कमतरता ठेवलेली नाही.त्यांना विश्लेषकांनी नंबर वन चे लेबल सुद्धा लावले आहे.छान.गुटखा वाल्यांना मोका लावण्याचा धाडसी निर्णय सुद्धा त्यांनी परवा घेतला .फारच छान.देवेंद्रजी ,जनहित चिंतकांच्या वतीने आपल्याला एकच विनंती आहे.गुटख्याची दमदार जाहिरात करणाऱ्या अजय देवगण आणि शहारुख  खान यांना आधी उचला. पहिला मोका त्यांना लावला पाहिजे.


  काय आहे मोका ? मोका म्हणजे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केलेला कायदा होय.(Maharashtra control of organaised crime act .MCOCA)

हा कायदा राज्यात १९९९ ला लागू झाला आहे.म्हणजे आज पर्यंत त्याने पंचविशी ओलांडली आहे.अनेक गुन्हेगार त्यात सापडले.हा कायदा गुटखा वाल्यांना लावणार हे ऐकून जनतेला खुप आनंद झाला आहे.आधी गुटखा नावाचा यमदूत कसा आहे ते पाहू.


     गुटखा तयार करणाऱ्या कंपन्या त्यात काय काय मिसळतात हे ऐकले तर डोके धरायची वेळ येईल. त्यात तंबाखू तर असतोच. सुपारीच्या चुऱ्यात इतर नशीले पदार्थही मिसळले जातात.सगळे विषच. शिवाय काचेचा सूक्ष्म चुरा असतो.तो चुरा दाढ आणि हिरड्यांना पोखरायचे काम करतो.त्यामुळे तंबाखूतील निकोटिन हे विष आणि इतर विषे रक्तात झिरप तात .ती रक्तातून मेंदूपर्यंत पोचतात व नशा निर्माण करतात. ही नशा अशीच कायम टिकावी म्हणून दिवसातून चार ते पाच वेळा गुटखा चघळला जातो.


   गुटख्याची एक पुडी ३० ते चाळीस रुपयांपर्यंत असते.गावठी गुटख्याशिवाय विमल,केसरी इत्यादी गुटखा कंपन्यांची नावे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहेत.त्यांची जाहिरात करणारे कोण आहेत ? तर शाहरुख खान अजय देवगण ,अक्षय कुमार सारखे सुपरस्टार  इत्यादी.महानायकाला सुद्धा तुम्हीं कधि तरी जाहिरातीत पाहिले असेलच.त्यांच्या वार्षिक कमाईत गुटख्याच्या जाहिरातीचा हिस्सा ७० टक्के आहे.मग गुटखा कंपन्या किती कमावत असतील पहा.गुटखा खाणारे कोण कोण आहेत.?शारीरिक कष्ट करणारे,मजूर,वाहन चालक, कामगार,हमाल,आणि अनेक महाविद्यालयीन  विद्यार्थी सुध्दा. गुटखा तरुणांमधून किशोरापर्यंत पोचला आहे.१८ वर्षे वया खालचे सुद्धा गुटखा चघळू लागले आहेत.मोका कोठे कोठे  लावणार ?  गुटख्याचे भयंकर परिणाम ऐकले तर डोके सुन्न होईल. गुटख्याने तोंडाचा,आणि रक्ताचा कॅन्सर होतो.देशातील एका पाहणी नुसार एकूण ३५ ते ४० टक्के युवा पिढी आहे.  त्यातील २६ टक्के पिढी गुटख्याच्या आधीन झाली आहेः गुटखा चघळणाऱ्या १००जणांपैकी  ३० अल्पवयात मरण पावतात.उरलेले हळू हळू झुरत जातात आणि साऱ्या कुटुंबाचा कॅन्सर बनतात. तोंड सुजलेले असे अनेक lपेशंट आपण टीव्ही वर आणि मोठ्या स्क्रीन वर पाहतो.जीवन बरबाद करणाऱ्या  या गुटख्यातून युवकांची सुटका झालीच पाहिजे.कायदा आपले काम करेल.व्यसनमुक्तीचा स्वतःचा निर्धार त्याहून अधिक चांगले काम करेल.

    उत्तर प्रदेश (युपी) सरकारने यावर कठोर पावले उचलली आहेत .

 महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा यशस्वी होवो हीच  प्रार्थना .


   ---------------------------------------