कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगुड तालुका -कागल , येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड या केंद्रावर जवाहर नवोदय विद्यालय साठी असणारे प्रवेश पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली. प्रविष्ट ३६० विद्यार्थ्यापैकी ३५३ विद्यार्थी प्रत्यक्ष हजर होते ७ विद्यार्थी गैरहजर राहिले. या केंद्रावर केंद्रीय निरीक्षक म्हणून धनाजी सातपुते यांनी तर केंद्र संचालक म्हणून प्राचार्य एस पी पाटील यांनी काम पाहिले. परीक्षा सुरळीत पार पडली. उपमुख्याध्यापक एस .बी सूर्यवंशी, ए एन पाटील मारुती टिपुगडे, एम एस कांबळे आर जी पाटील आदींनी काम पाहिले.
मुरगुड येथील मुरगुड विद्यालया केंद्रावर नवोदयच्या परीक्षेसाठी आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी आलेला पालक वर्ग


