कोल्हापूर न्यूज नेटवर्क
येथील विठ्ठल मंदिरात नामसंकीर्तन सप्ताह भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या समाप्तीला शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठल मंदिरापासून ही मिरवणूक गावभागातून एसटी बसस्थानक मार्गे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या घराजवळून बाजारपेठ मार्गे विठ्ठल मंदिरामध्ये या मिरवणुकीची सांगता झाली.
भक्तिगीतांच्या तालावर विठ्ठल भक्तांनी शहरातील प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी पालखीचे स्वागत केले.आरती केली. भाऊ येरुडकर कुटुंबातर्फे पालखीमध्ये सहभागी लोकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. पालखी सोहळ्यामध्ये भाविक, वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नामकीर्तनाचा जयघोष करत निघालेल्या पालखीला ठिकठिकाणी नागरिकांनी पाणी घालून पूजन केले.
सात दिवस चाललेल्या या सोहळ्यामध्ये काकड आरती, पारायण, भजन, प्रवचन व कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले. या सोहळ्याची सांगता महाप्रसादाने होत आहे. या अखंड पालखी मिरवणुकीत सहभागी झालेले विठ्ठल भक्तांचे नावे याप्रमाणे पांडुरंग उपलाने महाराज, आनंदा कदम, चंद्रकांत तिकोडे, विश्वास रावण, शामराव मेंडके, धोंडीराम राऊत, मारुती शेट्टी, संतोष लोहार, शिवाजी पाटील, श्रीरंग गुरव, राजाराम चव्हाण, कृष्णात कुंभार, धोंडीराम खैरे, शिवाजी चौगले, अनिकेत सुतार, सर्जेराव भाट यावेळी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------

