शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शिक्षण उपसंचालकांनी त्वरीत सोडवावेत :शिक्षक आमदार जयंत आसगावकर

Kolhapur news
By -


                       


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


शंभर पटाच्या आतील विद्यार्थी संख्येच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना संरक्षण मिळावे त्यांना स्टार देऊन सदर मुख्याध्यापकांच्या निवृत्ती पर्यंत सदर पद संरक्षित राहावे, इयत्ता नववी व दहावी या दोन्ही वर्गातील पटसंख्या वीस असल्यास तीन शिक्षक मंजूर करावेत अशा प्रमुख मागण्यासह अन्य मागण्या शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी करून कोणत्याही शिक्षक व कर्मचारी यांच्यावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची मागणी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे या प्रसंगी मागणी केली.


   शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे तीन जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांची बैठक शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर आणि कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक लेखाधिकारी यांच्या समवेत आज घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.


        या बैठकीमध्ये तीनही जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटना ,  शिक्षकेत्तर सेवक संघटना आणि संस्था चालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी आप आपल्या  जिल्ह्यातील शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता प्रस्ताव, मेडिकल बीले, पदोन्नती प्रस्ताव, सेवानिवृत्ती प्रस्ताव, अर्धवेळ शिक्षकांचे मान्यता प्रस्ताव, अनुकंपा मान्यता प्रस्ताव, बदली प्रस्ताव, रजा रोखीकरण प्रस्ताव, डीसीपीएस योजनेतील प्रस्ताव यासह अनेक प्रलंबित मागण्या बैठकीमध्ये मांडण्यात आल्या.


    शिक्षक  आमदार जयंत आसगावकर यांनी संघटनांनी मांडलेल्या शैक्षणिक समस्या  ताबडतोब सोडवाव्यात  अशा प्रकारची मागणी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली. 


     या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर  यांनी संघटनांनी विचारलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देऊन या प्रलंबित सर्व मागण्या सोडवण्यासाठी तीन्ही जिल्ह्यांच्या प्राथमिक، माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच वेतनपथक अधिक्षक व लेखाधिकारी यांना सभेतच आदेश दिले.


     वरिष्ट वेतनश्रेणीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्याकडे न पाठविता लेखाधिकारी यांच्याकडे पाठवावेत, जिल्हातंर्गत बदली मान्यतेचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे मान्यतेस न पाठविता वेतनपथक अधिक्षक यांच्याकडे पाठवून ॲटाच डिट्याच व्हावे, अनुंकपा नियुक्ती मान्यता प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनीच मान्यता दयावी योजना शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविण्याची गरज नाही, आपल्या विभगामध्ये अनाधिकृत शाळा आहेत त्या शाळांचा शोध घेऊन त्यांची यादी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिर करून संबंधित शाळावरती कारवाई करावी अशा आग्रही मागण्या संघटनांनी केल्या.


     आपल्या स्तरावरील सर्व मागण्या तात्काळ सोडविल्या जातील आणि शासन स्तरावरील मागण्यां संदर्भात वरिष्ट कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन कारवाई केली जाईल अशा प्रकारची ग्वाही शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिली. 


     सदर सभेत ज्या शिक्षक व सेवकांच्या शालार्थ आयडी प्रलंबित होत्या त्यापैकी काही शालार्थ आयडी मान्यतेचे आदेश शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या समवेत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते संबधित कर्मचाऱ्यांना वितरीत करण्यात आले. 


      या सभेस  उपसंचालक प्रभावतीकोळेकर,सहशिक्षण संचालक गणपती कमळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, सांगली माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, सातारा माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे,विशाल दशवंत उपशिक्षणाधिकारी सांगली,वेतन पथक कोल्हापूर अधिक्षक उदय सरनाईक, कोल्हापूर माध्यमिक अधिक्षक प्रविण फाटक, कोल्हापूर लेखाधिकारी नंदकिशोर भंडारे, प्राथमिक विस्तार अधिकारी रविंद्र ठोकळ, वेतन पथक सांगली अधिक्षक आबासाहेब लाड , वेतन निश्चिती सांगली लेखाधिकारी रविराज शिंदे,  वेतन पथक प्राथमिक सांगली अधिक्षक रियाज शेख,  माध्यमिक  सांगली अधिक्षक नरेंद्र माळी आदी अधिकारी उपस्थित होते.


     या सभेस व्यासपीठ अध्यक्ष एस डी लाड , शिक्षक नेते दादासाहेब लाड, संस्थाचालक संघ अध्यक्ष शारंगधर देशमुख, चेअरमन राहुल पोवार, सचिव आर. वाय. पाटील, बाळासाहेब डेळेकर, बी जी बोराडे, डी एस घुगरे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, खंडेराव जगदाळे,दत्ता पाटील, सी. एम. गायकवाड, बाबा पाटील,सुरेश संकपाळ, राजेंद्र कोरे, उदय पाटील, मिलींद पांगिरेकर, के. के. पाटील,विजय मेटकर, रविंद्र मोरे, के. बी.वाघमोडे,अकबर पन्हाळकर, संतोष आयरे आदीसह शिक्षक शिक्षकेत्तर संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येंनी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संघाचे  चेअरमन राहूल पोवार यांनी केले.







     




    कोल्हापूर : शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर  यांच्या समवेत बैठकी प्रसंगी बोलतांना शिक्षक आमदार जयंत आसगावकर ,एस डी लाड ,दादासाहेब लाड , राहूल पोवार माध्य. शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आदीसह अन्य मान्यवर.


           ---------------------