देवचंद' च्या प्राचार्यपदी प्रा. डॉ. रमेश साळुंखे

Kolhapur news
By -

                  


                           कोल्हापूर न्यूज नेटवर्क



 अर्जुननगर ता. कागल येथील देवचंद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख  प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे . डॉ.साळुंखे यांनी प्रसिद्ध मराठी साहित्यिक, संशोधक आणि समीक्षक  म्हणून साहित्यविश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.  समीक्षक, अनुवादक आणि नाट्यलेखक म्हणूनही ते परिचित आहेत. विविध वर्तमानपत्रे आणि वाङ्मयीन नियतकालिकांमधून त्यांचे लेखन सातत्याने प्रकाशित होत असते. तसेच ते शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे सक्रिय सदस्य असून मराठी भाषा-साहित्याच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीमुळे विद्यार्थी व संस्थेच्या वर्तुळातून समाधान व्यक्त होत आहे. 


          -------------------