११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १२,५१,२५९ विद्यार्थ्यांची नोंदणी

Kolhapur news
By -

 

                      


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ९५९४ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. आत्तापर्यंत १२,५१,२५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केली आहे.


   दिनांक ०६/०६/२०२६ रोजी पासून नियमित दुस-या फेरीतील विद्यार्थी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी नविन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग-१ मधील दुरुस्ती आणि भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) दिनांक ०९/०६/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वा. पर्यंत भरु शकतात. या फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात आल्याने सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज लॉक करणे अनिवार्य आहे. आज दिनांक ०६/०६/२०२६ रोजी ५५,११७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.


   विद्यार्थी / पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे  शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिली आहे.


          ------------------------