मुंबई : तमाम महाराष्ट्रवासीयांसाठी एक आनंदाची बातमी. ज्याची वाट आपण चातक चोचीने पाहत होता, तो मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालाय. गोवा, दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
-----------------

