गगनबावडा तालुका शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्थेची
११ वी सर्वसाधारण सभा निवडे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभाग्रहामध्ये मोठ्या उत्साहात पार पडली, याप्रसंगी सर्व आजी माजी संचालक, संस्था कर्मचारी, संस्थेचे सभासद तसेच पिग्मीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुजित खोराटे होते, अहवाल वर्षात मृत पावलेले सभासद, सभासदांचे नातेवाईक, पिग्मीधारक, समाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात तसेच देशाच्या संरक्षणार्थ हौतम्य प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून सभेच्या कामकाजास सुरुवात झाली, संस्थेचे माजी चेअरमन श्री. एकनाथ वरेकर यांनी प्रस्तावना करताना संस्थेच्या विविध समाजिक उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे संस्थापक निलेश
म्हाळुंगेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या सुरुवातीपासूनच्या वाटचालीबद्दल माहिती देऊन संस्थेच्या चढत्या आलेखाबद्दल समाधान व्यक्त केले, संस्था सध्या सभासदांसाठी विविध उपक्रम राबवित असून त्यामध्ये संस्थेमार्फत सभासदांसाठी दुर्घटना समयी वीसपट परतावा देणारी अभिनव अशी कुटुंब कल्याण ठेव योजना सुरु करीत असलेबद्दल सांगितले,
चेअरमन श्री. सुजित खोराटे यांनी अहवाल वाचन केले व संस्थेला ऑडिट वर्ग 'अ ' मिळाल्याचे सांगितले.
संस्थेमार्फत कोविड कालावधीमध्ये सेवा देणारे १०८ चे चालक व डॉक्टर तसेच संस्थेचे पिग्मीधारक, सभासदांचे पाल्य, संस्थेचे माजी संचालक तसेच संस्था कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सर्व सभासदांना भागभांडवलावर १२% लाभांश व वर्गणीवर ५% व्याज रोख स्वरूपात व आकर्षक भेटवस्तू (संस्थेचा नमोल्लेख असलेला जमखाना) देण्यात आली.
सभेचे सूत्रसंचालन संचालक सुभाष भोसले यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन श्री. शिवाजी शिंदे यांनी मानले.
- संस्थेच्यावतीने सभासदांचा सत्कार करताना मान्यवर .
