पाटीलवाडी शाळेत "शब्द वेल " हस्तलिखिताचे प्रकाशन

Kolhapur news
By -


  कोल्हापूर न्यूज  / अणदूर प्रतिनिधी - रघुनाथ दळवी

विद्या मंदिर पाटीलवाडी ता.गगनबावडा प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी स्व-हस्ताक्षरात तयार केलेल्या "शब्द वेल " या हस्तलिखिताचे प्रकाशन उपक्रमशील शिक्षिका रुपाली कुंभार,अमृता पाटील            यांचे हस्ते करण्यात आले.या हस्तलिखितामध्ये,विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बालकविता,गोष्टी, या बरोबरच,शब्द कोडी,विनोद,विज्ञान कोडी,इंग्रजी शब्द संपत्ती वाढविण्यासाठी विविध प्रकारची चित्रे,ऱ्हाईम्स, राईमिंग वर्ड ,
,गणित विषयाच्या संदर्भात सूत्रे व क्लुप्त्या, विविध प्रकारची रंगभरण चित्रे,योगा,सामान्य ज्ञान, सामाजिक प्रश्नावली आदीचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे .
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी,त्यांचा भाषिक, बौद्धिक,सामाजिक विकास घडविण्यासाठी,या हस्तलिखिताचा फायदा होणार आहे.यासाठी बाजीराव जाधव,विश्रांती पोवार,के.डी.जाधव,सरिता पाटील,अलका गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी
 गजानन कुंभार,श्रावण कांबळे,सतीश चौगले ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.