सत्तेच्या लालसेनं आंबेडकरांच्या विचारांचा विसर.....व संगनमताने राजकीय दरोडा
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे
कोल्हापूर न्यूज नेटवर्क
- राजकारणातील सत्तेच्या लालसेपोटी मागासवर्गीय समाजातील अनेक नेत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे आणी सत्तेच्या वाट्यात भागीदारी होत असताना समाजाचा वाटा विसरल्यामुळे अनेक मागासवर्गीय नेत्यांनी राजकीय सत्ताधाऱ्यांच्या मदतीने समाजाची एक अखंड पिढीच विकासापासून खूप दूर लोटली असल्याची खंत पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी व्यक्त करत राजकीय लाचारी स्वीकारलेले समाजातील नेतेच समाजावर राजकीय दरोडा घातला असल्याची घणाघाती टीका केली.ते कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता संघटनेच्या जिल्हा बैठकीला व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर शासकीय विश्रामगृहावर संबोधित करताना बोलत होते.
पुढे बोलताना प्रा.वायदंडेे म्हणाले की, देशाचे संविधान जर बदललं गेलं तर त्याला पूर्णपणे आंबेडकर विचारांची चळवळ जबाबदार असेल म्हणूनच पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्यांमध्ये तरुणांची वैचारिक फौज निर्माण करणार असल्यामुळे राजकीयआरक्षण व नोकर भरतीतील आरक्षण , आणि संविधान बदलाचे वारे याच्यातील फरक चांगला कळणार असल्यामुळे भविष्यात समाज वैचारिक जागृत राहणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष राजू घाटगे यांनी केले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष (वरिष्ठ) गणेश घाटगे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष (युवक) नितीन आवळे, कोल्हापूर जिल्हा महासचिव जनार्दन घाटगे, कोल्हापूर जिल्हा संघटक प्रशांत जाधव, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष (युवक) बालाजी कदम, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख रुकसाना मुल्ला, शिरोळ तालुका अध्यक्षा (युवती) साबेरा इंगळे, हातकलंगले तालुका अध्यक्ष रवींद्र हंकारे, हातकणंगले तालुका संपर्कप्रमुख दौलत घाटगे, हातकलंगले तालुका कार्याध्यक्ष शिवाजी घाटगे, सामाजिक कार्यकर्ते चांदणे, रवींद्र काळे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीचे नियोजन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला यांनी केले.
शेवटी आभार पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन आवळे यांनी मानले.
कोल्हापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचा सत्कार करताना राजू घाडगे, जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुला व इतर
