कोल्हापूर न्यूज / अणदूर प्रतिनिधी
राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकारच्या वतीने इ.८वी मध्ये एन.एम.एम.एस परीक्षा घेण्यात येते. तब्बल ४८ हजार शिष्यवृत्ती मिळवून देणाऱ्या या परीक्षेत संकल्प क्लासेस म्हासुर्ली चे दोन वर्षात तब्बल 95 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र बनले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोरोनाच्या परिस्थितीमुळे परीक्षा लांबली असताना देखील योग्य नियोजन, कार्यशाळेचे आयोजन,सातत्य ,प्रश्नपत्रिका सराव मार्गदर्शनामुळे तब्बल 95 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत. या विद्यार्थ्यांना सुमारे 40 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
ग्रामीण भागातील मुलांना माफक फी मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने संकल्प क्लासेसची स्थापना गोरख चौगले यांनी केली. योग्य नियोजन ,सराव , योग्य मार्गदर्शन,जिद्द चिकाटीच्या जोरावर अल्प कालावधीत क्लासने फिनिक्स भरारी घेतली आहे.
या विद्यार्थ्यांना गोरख चौगले, संभाजी पाटील ,संदीप जाधव शिवाजी साबळे,मोहसीन मुल्लानी, अपर्णा सुतार ,ज्योती अस्वले, सुप्रिया सावत, राजाराम चौगले यांचे
मार्गदर्शन लाभले.
