कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे शिल्पकार , भारताचे उपपंतप्रधान व सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेचे प्रतिक स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे जयंती निमित्त देवचंद महाविद्यालयाचे संचालक प्रशांत गुंडे यांचे हस्ते स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचे स्मारकास पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन करणेत आले.
प्रशांत गुंडे, विठ्ठल वाघमोडे , सुधाकर माने यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिना उजाळा दिला . यावेळी प्रशांत गुंडे , सुधाकर माने , विठ्ठल वाघमोडे , अशोक खांडेकर , नंदकुमार राजिगरे , वैभव चव्हाण , पांडूरंग कुराडे , सज्जन कांबळे , बाळासाहेब यादव , आकाश कोळी , बाबूराव तिप्पे उपस्थित होते.


