कोल्हापूर न्यूज / वि. रा. भाेसले
चाळीस वर्षांपूर्वी एक गाणं शाळेत मुलांना ऐकवले जायचे.कोणी ते लिहिले आणि कोणी संगीत बध्द केले हे माहिती नाही पण त्या गाण्यात अतीव अर्थ भरला होता.
"देव बकरा मागत नाही
देव नारळ मागत नाही !"
अशा त्या गाण्याच्या ओळी होत्या.
त्यात चुकीचे असे कांहीच नाही.देवाच्या नावावर बकरी कापायची आणि ती शिजवून माणसांनींच खायची .देवाला ,देवीला मात्र पोळीचा नैवेद्य.
हे भयानक वास्तव आहे.आज काल सर्वत्र म्हाईचा सिझन सर्वत्र सुरू आहे.म्हाईच्या निमित्ताने मुक्या बकऱ्यांची कत्तल होतांना दिसते.
कोणी सांगितले की बकरी कापल्याने देवता प्रसन्न होते.ते पूर्ण चुकीचे आहे.त्याची थोडी मीमांसा जीवशास्त्रीय दृष्ट्या करू.
डार्विनच्या सिध्दांता नुसार सृष्टीत दोन नियम आहेत.
१. जीवो जीवस्य जीवनम् .
२. बळी तो कान पिळी.
Survival of the fittest.
पहिल्या नियमानुसार एक जीव दुसऱ्या जीवावर जगत असतो.जसे वाघ सिंह इतर प्राण्यांची शिकार करून खातात.जगण्यासाठी त्यांना दुसऱ्या जीवावर अवलंबून रहावे लागते.शिकार मिळाली नाही तर त्यांची उपासमार होते. उपासी आहे म्हणून ते कांहीं गवत खात नाहीत.सृष्टीने त्यांना मांसाहारी बनवले आहे.जे.प्राणी मांसाहारी आहेत त्यांना जबड्यात धारदार सुळे असतात. पंज्यात बळकट व टोकदार नखे असतात.शिकार करणाऱ्या प्राण्यांची सृष्टिनेच सोय लावलेली असते.
त्यांना आपण मांसाहारी प्राणी म्हणतो.ते जीभेने पाणी पितात.
या मांसाहारी प्राण्यांसारखे माणसाला धारदार सुळे नसतात व टोकदार बळकट नखेही नसतात.
माणूस निसर्गतः मांसाहारी प्राणी नाही .तो शाकाहारी प्राणी आहे.शाकाहारी प्राणी ओठाने पाणी पितात.
माणसाने सृष्टीच्या विरुद्ध वागायला सुरुवात केली आहे.जिभेचे चोचले पुरवण्या करिता बकरी,कोंबड्या,डुकरे मारून खातो.
दुसऱ्या नियमानुसार जो बलवान असेल तो दुसऱ्या जीवावर आपला उदरनिर्वाह करतो.
लांडगा हा प्राणी बकऱ्याची शिकार करू शकतो.वाघ मात्र लांडग्या ची शिकार करण्याइतका बलवान आहे.
थोडक्यात जीवशास्त्रीय नियमांनुसार माणूस हा शाकाहारी म्हणजे धान्य, कंद मुळे यावरच जगणारा प्राणी आहे.बुद्धिमत्तेच्या जोरावर तो शस्त्र संपन्न झाला आणि मुके प्राणी मारून खाऊ लागला.वाघ कच्चे मांस खातो माणूस ते शिजवून खातो येवढेच.
'अहिंसा परमो धर्म: '
हे तत्त्व सनातन हिंदू, जैन बौद्ध धर्मात पवित्र मानले जाते.
हा नियम पाळला जातो का ?
मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही .ते हत्येला विरोधही करू शकत नाहीत.केवळ भयंकर वेदनेने ओरडणे विव्हळणे येवढेच त्यांच्या नशीबी असते.
या सर्व पार्श्वूमीवर म्हाईचा विचार करावा.बकरी मारून खाणे हे सृष्टी नियमानुसार नाही . ती हत्या आहे.प्रत्येक हत्येचे अनिष्ट फळ मिळतच असते.
सर्व संतांनी प्राणी हत्येची निंदा केली आहे.जे समर्थन करतात ते एकतर अघोरी असतात किंवा संत नसतात.
संत बाळूमामा हे संपूर्ण शाकाहारी होते. बकऱ्यांवर त्यांचे नितांत प्रेम होते.त्यांचे बकऱ्यांचे कळप म्हणजे तिर्थक्षेत्र मानले जातात.
तरीही त्यांच्या बकऱ्यांची म्हाईच्या निमित्ताने अमानुष हत्या होत असते.
याला श्रध्दा म्हणत नाहीत ती अमानुष अघोरी अंधश्रध्दाच आहे.

