हातकणंगले मतदार संघासाठी महायुतीकडून संजय पाटील यड्रावकर ,विनय कोरे, शैमिका महाडिक, राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा

Kolhapur news
By -

             कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात

शिरोळमधील अपक्ष आमदार असलेल्या

राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय

पाटील यड्रावकर यांच्या नावाची महायुतीकडून

उमेदवारीसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती

आहे. तर विद्यमान खासदार धैर्यशील माने हे

सध्या शिंदे गटात आहेत. पण त्यांच्याविरोधात

नाराजी असल्याचे भाजपच्या अहवालात म्हटलं

आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांच्या नावाला

भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे.


दरम्यान महायुतीतील नेते माने यांना उघड विरोध करू लागल्याने येथे काय होणार आहे ? याचा अंदाज भाजपला आला आहे. त्यातूनच पर्यायांची चाचपणी सुरु झाली आहे. यातूनच संजय पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे, शौमिका महाडीक, राहुल आवाडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असली, तरी खासदार माने सहजासहजी ही जागा हातून सोडणार नाहीत. तर एकनाथ शिंदे मात्र मानेंनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

   भाजप कोणत्याही निवडणुकीची तयारी फार अगोदरपासून करतो. या उलट निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या, तरी उमेदवारावरून विरोधी पक्षात गोंधळाची स्थिती पाहावयास मिळते. भाजपने एक वर्षापासून टप्प्याटप्याने सर्व्हे केले आहेत. यामध्ये 'कोल्हापूर' व 'हातकणंगले' मतदारसंघात अपेक्षित यश दिसत नसल्याने त्यांनी चाचपणी सुरू  केल्याचे समजते .