कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शेतकरी बांधवानो ज्यावेळी तुम्ही कीटकनाशके खरेदी करायला जाता तेव्हा नामांकित दुकानात किंवा प्रमाणित डीलर्सकडे जावे. त्यांच्याकडून तुम्ही कीटकनाशके खरेदी करणे गरजेचे आहे. बनावट कीटकनाशके खरेदी करणे टाळा ज्यावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये सूचना लिहिलेल्या नसतात अशी कीटकनाशके खरेदी करण्याचे टाळावे.
इतकेच नाही तर तुम्ही कीटकनाशके खरेदी करता त्यावेळी तुम्ही कोणते उत्पादन घेत आहात हे देखील लक्षात ठेवावे. ज्यामध्ये EPA नोंदणी क्रमांकाचा समावेश करणे गरजेचे आहे. यासह, त्यात कोणते सक्रिय घटक लिहिलेले आहेत ते देखील पाहणे गरजेचे असते.
हे लक्षात घ्या की , सर्व घटक पर्यावरण संरक्षण एजन्सी म्हणजेच EPA द्वारे लेबलवर लिहिलेले आहेत. तुम्ही कीटकनाशके खरेदी करता त्यावेळी त्याचे बिल नेहमी घ्यावे. जेणेकरून पिकाचे काही नुकसान झाले असल्यास त्याचा पुरावा तुमच्याकडे असतो.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बाजारातील महागड्या वस्तूंऐवजी स्वस्त वस्तू घेण्यास लोक प्राधान्य देत असतात, असे अनेकदा दिसून आले आहे. समजा जर तुम्ही स्वस्त वस्तूंना बळी पडलात तर लोक तुम्हाला खोट्या वस्तू देण्याची शक्यता असते.
त्यामुळे कीटकनाशके खरेदी करायला जात असता तेव्हा स्वस्तात मिळणाऱ्या औषधांना बळी पडू नका. कारण ते बनावट असण्याची दाट शक्यता असते. जरी खरी कीटकनाशके थोडी महाग असली तरीही खरेदी करा.

