कोल्हापूर न्यूज नेटवर्क
एस टी महामंडळाने प्रवाशांसाठी अयोध्या यात्रेची शानदार सोय केली आहे.यामध्ये काशी विश्वनाथ ,प्रयागराज व शेगाव या तिर्थक्षेत्रांचा सुध्दा समावेश आहे.
४० प्रवाशांसाठी उत्तम आरामशीर बस असणार आहे.त्यामध्ये पुशबॅक सीट्स ची सोय असलेले दीर्घ प्रवासात रेलून किंवा झोपून विश्रांती सुध्दा घेता येते.
प्रवास भाडे ७०००+निवास व भोजन ३००० असा एकूण मानसी १०,००० रू.पर्यंत खर्च येईल.निवास व भोजन अल्प दरात सोय करणेत येईल.
या सुवर्ण संधीचा फायदा प्रवाशांनी घ्यावा.
त्यासाठी आपापल्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधावा असे एस टी महामंडळाचे पी आर ओ अभिजित भोसले यांचे मार्फत कळविण्यात आले आहे.

