राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही - आमदार नीलेश लंके

Kolhapur news
By -

         



              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  पारनेर : पारनेरचे आमदार नीलेश लंके हे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. या चर्चेला आता स्वतः आ. निलेश लंके यांनीच पूर्णविराम दिला. परंतु, राजकारणात कधी कोणती गोष्ट घडेल हे सांगता येत नाही. मी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी सहकाऱ्यांची इच्छा आहे, असे म्हणत त्यांनी शरद पवार गटात जाण्याच्या विषयाला बगल देत आपली भूमिका मांडली. ते पत्रकारांशी बाेलत होते.


आमदार निलेश लंके म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून माझ्या मतदार संघात मी कार्यक्रम घेत आहे. त्यासाठी अमोल कोल्हे यांचा कार्यक्रम देखील घेतला, याचा अर्थ मी पक्ष बदल करत आहे, असा होत नाही. मला लोकसंपर्क वाढवण्याचा छंद आहे. मुळात राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल हे सांगता येणार नाही.