कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मराठा आणि धनगर समाज एकच आहे. मी सुद्धा मेंढरे पाळली आहेत, मी सुद्धा धनगर आहे. आपण मटण खाल्ल्याशिवाय राहत नाही त्यामुळे धनगर हे आपले अन्नदाता आहेत असे विधान कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की ,धनगर समाज वेगळा, मराठा समाज वेगळा असं मला कधीच वाटलं नाही. मी सुद्धा मेंढरं पाळली आहेत, मी सुद्धा धनगर आहे. मराठा समाज न्याय मिळवण्यासाठी जसा धपडत आहे, तसा धनगर समाज देखील धडपडत आहे. पण एक दिवस न्याय नक्कीच मिळणार यात शंका नाही. मटण खाल्याशिवाय आपण राहत नाही आणि ते मेंढपाळमुळे मिळतं, त्यामुळे ते आपले अन्नदाता आहेत. कोणताही प्रश्न एकत्र हाताळलं की हात बळकट होतात .

