गलगले विद्यामंदिरच्या मदतीसाठी धावले माजी विद्यार्थी

Kolhapur news
By -

      

    


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


व्यक्तीच्या सर्वांगीण विकासामध्ये प्राथमिक शाळेचा वाटा सिंहाचा असतो. शिक्षणाची सुरुवात ज्या ज्ञानमंदिरापासून झाली त्या ज्ञानमंदिराच्या जडणघडणीमध्ये माजी विद्यार्थ्यांनी आपले योगदान देऊन  ज्ञान मंदिराच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन गलगलेचे माजी तंटामुक्त अध्यक्ष व पुणे येथील लॉजिस्टिक कंपनीचे माजी व्यवस्थापक शिवाजी पाटील यांनी केले . 

   विद्यामंदिर गलगले शाळेच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेह  मेळाव्यात ते बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका छाया चौगुले होत्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्यवस्थापक एम.पी . पाटील व सेवानिवृत्त शिक्षक जी .एस .पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या स्नेह मेळाव्यासाठी  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  विजय जाधव ,उपाध्यक्ष विजय पाटील,  सदस्य अजित पडळकर, उत्तम पाटील, बाळासो पाटील , अरुण वर्धन , माजी उपाध्यक्ष राजेंद्र पाटील , माजी शिक्षक दादासाहेब कुंभार व  सुरेश खोत यांच्यासह शाळेचे माजी विद्यार्थी , बाळनाथ डवरी , रमेश कदम , नूतन सकट , संदीप राऊत , वैशाली कदम  उपस्थित होते . माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांची मनोगते झाली. 
 माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि त्याला येणारा सर्व खर्च करण्याची तयारी दर्शवली त्यानुसार शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ९० हजार रुपये मेळाव्यातून जमा  झाले . 

देणगीदारांची नावे खालील प्रमाणे :

उत्तम पाटील, सदस्य शाळा व्यवस्थापन समिती गलगले  -10000/-
 
 सागर पडळकर-  10000/-

  कृष्णात दत्तू मगदूम-10000/-

  राजेंद्र पाटील माजी उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती गलगले -11000/-

  शिवाजी पांडुरंग पाटील लॉजिस्टिक मॅनेजर पुणे -5000/-

  मधुकर पिराजी पाटील केडीसीसी बँक  सेवानिवृत्त व्यवस्थापक -5000/-

  महादेव गंगाराम पाटील-5000 /-

  गौतम शिंदे -2000/-

  उमेश डावरे 
  शशिकांत जाधव
 श्री अक्षय पडळकर
  विनायक पडळकर यांचेकडून एक खोलीसाठी लागणारा सर्व खर्च

  मुख्याध्यापिका छाया चौगुले यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले व शाळेच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली .