आदमापुरच्या बाळूमामा मंदिराला अयोध्येच्या राम लल्लांचा प्रसाद

Kolhapur news
By -

          


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क

  

आदमापुरच्या बाळूमामा मंदिराला अयोध्येच्या राम लल्लांचा प्रसाद नुकताच प्राप्त झाला.

    मुरगूड हून आणि तालुक्यातील इतर गावा मधून १४०० भाविक अयोध्या यात्रेला गेले होते.  हे भक्तगण अयोध्या यात्रा करून परत आले असून उत्तरप्रदेश शासनाच्या पर्यटन विभागामार्फत त्यांना  वितरित करण्यात आलेला प्रसाद आज बाळूमामा मंदिरास अर्पण करण्यात आला.ट्रस्टच्या प्रशासक रागिणी खडसे व  पुजारी मुरारी यांनी मंदिराच्या वतीने प्रसाद स्विकारला.

      प्रसादाचे स्वरूप याप्रमाणे आहे.

     यज्ञकुंड विभूती,शरयू जल ,सोबत.रामलल्लांच्या

मनमोहक प्रतिमेचे प्रकाशचित्र ,राम मंदिर प्रकाशचित्र .

     अयोध्या यात्रींची नावे अशी .

   सर्जेराव भाट,तानाजी भराडे,ओंकार पोतदार,जगदीश गुरव.

    अयोध्येचा प्रसाद आल्याचे वृत्त समजताच आदमापुर ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

    भक्त,भक्ती आणि भक्तेय असे हे मिलन होते.