कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ या कायद्यान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अभिनय उपक्रमाद्वारे नागरिक आणि प्रशासन यामधील अंतर दूर करण्याचे नियोजन केले आहे. सेवा हमी कायदयाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पददर्शी प्रकल्पाची सुरुवात कोल्हापूर जिल्हयातून होणार असून या कार्यक्रमाचा "ऑनलाईन शुभारंभ " १५ ऑगष्टला दुपारी १.०० वाजता महासैनिक दरबार येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व विभाग प्रमुख खाते प्रमुख, कर्मचारी यांनी आपले अधिनिस्त सर्व कर्मचारी सदर कार्यक्रमास बिनचूक उपस्थित रहावे. तसेच उपस्थितीबाबतची सर्वाची हजेरी घेऊन त्याचा अहवाल रचना व कार्यपध्दती विभागकडे देणेत यावे असे पत्र कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी काढले आहे .
(

