कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वेदगंगेत पाण्याची खोली व साठा कमी असलेने बऱ्याच लहान मोठ्या मूर्ती काठावरच उघड्यावर पडलेल्या हाेत्या . गणेश विसर्जना विसर्जनानंतर बऱ्याच ठिकाणी असे चित्र पहावयास मिळाले .
गणेश विसर्जन हे वहात्या पाण्यात करावे असे भक्ति शास्त्रात म्हंटले आहे व पंडितांनी ही सांगितले आहे.
फार पूर्वी पासून रूढ असलेली ही परंपरा आता काळा प्रमाणे हळू हळू बदल स्वीकारताना दिसत आहे.पूर्वी फक्त घरगुती मूर्ती असायचे .नदया ओढे यांना खळखळाट असायचा.प्रवाही पाण्यात त्यावेळी मूर्ती सोडल्या जायच्या.आता प्रवाह फक्त धो धो पावसाळ्यात महापुरात पहायला मिळतील .समुद्रातील खारे पाणी बाष्पीभवनाने गोडे होऊन आकाश मार्गे जमिनीवर येते.हे जीवन आपण धरणे बांधून साठवून ठेवतो.त्याशिवाय पर्याय पण नाही. त्यामुळे वहाते पाणी आता दुर्मिळ झाले आहे.
गणरायाच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून पर्याय शोधले पाहिजेत.
पहिला पर्याय असा की, नदी किंवा तलावात मूर्ती विसर्जित न केलेल्या बरे.त्यामुळे नदीत ,तलावात गाळ साठत राहातो आणि पाणी सुध्दा प्रदूषित होते.कांहीं विहिरी तर विसर्जनामुळे पूर्णपणे भरून गेल्या आहेत.शेतकऱ्यांनी मग करायचे काय ? अशा विहिरीत वाढलेल्या वेली व झुडूपांमुळे कांहींना आपले प्राण ही गमवावे लागले आहेत.
यावर पर्याय काय ?
पर्यावरण पूरक आणि लोकहित कारक विसर्जन म्हणजे घरगुती विसर्जन होय.
एखाद्या मोठ्या भांड्यात (टब) मध्ये पाणी घेऊन मूर्तीचे त्यात विसर्जन करता येते.वहाते पाणी म्हणजे चावीचे पाणी. विसर्जनापूर्वी पूजा आरती करावी.मूर्ती पूर्ण विरघळली की ते पाणी बागेतील झाडांना किंवा पिकांना सोडता येते.निर्माल्याचे खत करावे.या मुळे प्रदूषण तर नाहीच उलट पिकांना संजीवन मिळेल.
कित्येक नगर परिषदा व महानगर पालिका यांनी या नवीन कल्पना स्वीकारल्या आहेत तशा सोयी सुध्दा उपलब्ध करून दिल्या आहेत.
कोल्हापुरात मोठे गणपती मोठ्या खणीत विसर्जन करण्याची सोय केली आहे.तेथे ते विसर्जित केले जातात.मुंबईत समुद्रात विसर्जन होते.
गणेश हे विद्येचे दैवत मानले जाते . त्यामुळे त्याच्या कडून योग्य त्या विद्येची अपेक्षा करावी .अंधश्रद्धा आणि श्रद्धा यामध्ये एक सीमारेषा असते. एकमेकात त्यांना मिसळू देऊ नये.
बदल स्वीकारण्याची तयारी ठेवणे हेच जन हिताचे आहे.