स्वच्छता कर्मचाऱ्यांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन

Kolhapur news
By -

 

             


       कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


         मुरगूड येथील नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना राख्या बांधून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले.

    बहीण आपल्या भावाला आज राखी बांधते. भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची असते.

     राष्ट्र संरक्षणाची जबाबदारी घेतलेल्या भारतीय जवानांना सुद्धा अनेक भारतीय भगिनी मंडळानी आणि शाळांनी राख्या पाठवल्या आहेत.

     स्वच्छता कामगार  शहराच्या आरोग्याचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावत असतात.त्यांना राख्या बांधल्या व शहराचे नागरिक त्यांच्या सेवेचे  ऋणी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.कामगार भगिनींनी सुद्धा कार्यकर्त्यांना राख्या बांधल्या.आज ९ ऑगस्ट या क्रांतिदिनाचे औचित्य साधून हुतात्मा ज्योतीच्या साक्षीने  पहाटे ५ वाजल्यापासून हा कार्यक्रम घेण्यात आला.स्वच्छता कामगारांचे काम भल्या पहाटे सुरू होत असते.

  या नवीन उपक्रमाचे प्रसारमाध्यमांनीही स्वागत व कौतुक केले.


            -----------------------