कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर मधील नागाळा पार्क येथील २२० खाटांचे सुसज्ज विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील आधुनिक सहा मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मेंदू, मणका, प्लास्टिक सर्जरी, ईएनटी आणि ऑन्को सर्जरीसारख्या अनेक क्लिष्ट व जटिल शस्त्रक्रिया AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुलभ करणाऱ्या रोबोटिक 3D, 4K VITOM STORZ EXOSCOPE (जर्मनी) या अत्याधुनिक यंत्रणेच्या लोकार्पण सोहळा यावेळी झाला . ही महाराष्ट्रातील पहिली अशा प्रकारची यंत्रप्रणाली आहे.
अत्याधुनिक मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर५ आणि महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक 3D, 4K व्हिटम स्टोर्झ एक्सोस्कोप प्रणालीचे उद्घाटन ही झाले.
प्रगत, AI- तंत्रज्ञानावर चालणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये एक मोठी झेप असल्याचे यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. यावेळी विख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर संतोष प्रभू , डॉक्टर सुजाता प्रभू , डॉक्टर आकाश प्रभू यांच्यासह त्यांचे सहकारी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------