नवी दिल्ली : मंगळवारी सकाळी १० वाजता दिल्लीतील संसद भवन संकुलात एनडीए खासदारांची बैठक सुरू झाली आहे. बैठकीपूर्वी एनडीए खासदारांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींना पुष्पहार घातला.
यावेळी खासदारांनी हर हर महादेवच्या घोषणा दिल्या. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात खासदारांना संबोधित करतील. त्यांच्या भाषणात ते ऑपरेशन सिंदूर, देशाच्या सुरक्षा आव्हानांवर आणि संसदीय चर्चेत उपस्थित केलेल्या अनेक राजकीय मुद्द्यांवर बोलू शकतात.
२१ जुलै रोजी सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एनडीए संसदीय पक्षाची बैठक ही एनडीएची पहिली बैठक आहे. भाजप आणि त्यांच्या सर्व मित्रपक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले होते. एनडीएच्या सर्व खासदारांना या बैठकीला उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते.
---------------