मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मराठी अमराठीच्या मुद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना आपले तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्रात मराठी व अमराठी माणूस सुरक्षित आहे. इथे कोणताही वाद नाही. काहीजण या प्रकरणी मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मराठी जनता त्यांना निवडणुकीत त्यांची योग्य जागा दाखवेल. त्यामुळे दुबे यांनी या प्रकरणी कोणतीही विधाने करून नयेत, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राज व उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णपणे संपेल असे वादग्रस्त विधान भाजप आमदार निशिकांत दुबे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सोमवारी याविषयी बोलताना त्यांना असे काहीही न बोलण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, निशिकांत दुबे यांनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत. येथील परिस्थिती हँडल करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत.
----------