लंडन :शुभमन गीलच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्धचा 5 वा क्रिकेट सामना अवघ्या सहा धावांनी जिंकला .पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत २:२ अशी बरोबरी झाली आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात 224 आणि दुसऱ्या डावात 296 धावा केल्या.या उलट इंग्लंड च्या संघाने पहिल्या डावात 247 व दुसऱ्या डावात 367 धावा केल्या.भारताने इंग्लंडला 274 धावाचे लक्ष्य दिले होते .इंग्लंडचा डाव 367 धावांत संपुष्टात आल्याने भारताने हा सामना अवघ्या 6 धावांनी जिंकला आहे.
भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली व देशाला हा अशक्यप्राय असा विजय मिळवून दिला.
भारतीय गोलंदाजीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
---------------------