शिक्षकांचे पगार २५ ऑगस्टपर्यंत व्हावेत - भरत रसाळे

Kolhapur news
By -

 

              



           कोल्हापूर न्यूज नेटवर्क 

   

      चालू वर्षी महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा  असा गणेश चतुर्थी हा सण दि . 27ऑगस्ट पासून सुरू होत आहे . भक्तिमय वातावरणामध्ये आनंदाने व अतिशय उत्साहाने 11 दिवसांपर्यंत  हा सण साजरा करण्यात येतो . असा हा सण ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस येत असलेले चालू महिन्याचे वेतन 25 ऑगस्टपर्यंत करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री , शिक्षण मंत्री आणि राज्याचे शिक्षण संचालक यांच्याकडे केली .


समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबतचे निवेदन शासनाकडे पाठवण्यासाठी  कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांचेकडे देण्यात आले .यावेळी शिक्षण उपनिरीक्षक समरजितसिंह पाटील हे उपस्थित होते .


या शिष्टमंडळात समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्यासह ,राज्य सचिव शिवाजी भोसले ,शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे व  पतसंस्थेच्या संचालिका वर्षाराणी वायदंडे या उपस्थित होत्या . आपला प्रस्ताव शासनाकडे तात्काळ पाठवण्यात येईल असे आश्वासन शिक्षण उपसंचालक  महेश चोथे  यांनी दिले .

         -----------------------