कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र व कर्नाटक येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर येथील केदारलिंग च्या नागपंचमी यात्रेते भक्तीचाच महापूर पहायला मिळाला.
भल्या पहाटे भर पावसात भक्त गणांनी दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी रांगा लावल्या होत्या.गावोगावच्या नेते मंडळीनी , उद्योजकांनी, व्यापाऱ्यांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा केदारलिंगाच्या दर्शनासाठी कुटुंबासह हजेरी लावली होती. नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी भाविकांची श्रध्दा आहे.
महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सपत्नीक केदारलिंगाची पूजा करण्यात आली. यावेळी सरपंच व प्रमुख ग्रामस्थही उपस्थित होते. मुरगूड येथील शिवभक्तांच्या मार्फत उद्या मंदिर स्वच्छतेचा संकल्प सोडण्यात आला आहे.
ग्रामपंचायती मार्फत दर्शनार्थीसाठी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.भुदरगड पोलिस ठाण्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.वाहतूक व्यवस्था देखील नियंत्रणात होती.
----------------------