स्वच्छ सुंदर शहर अभियानात मुरगूड नगर परिषदेचा राज्यात चौथा क्रमांक.

Kolhapur news
By -

 

           

 

       

           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


             स्वच्छ सुंदर शहर अभियानांतर्गत झालेल्या मूल्यमापनामध्ये मुरगूड नगर परिषदेचा राज्यात चौथा क्रमांक आला आहे. राष्ट्र पातळीवर केंद्रात 26 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. 


      माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांचे भेटवस्तू देऊन अभिनंदन केले. नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिश वाळुंज हे समारंभाचे प्रमुख अतिथी होते. ते म्हणाले की आम्हा कर्मचाऱ्यांचा सत्कार म्हणजे लोकांनी दिलेले प्रोत्साहन होय. अशाच पाठिंब्यावर आम्ही पहिला क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करू. वाढदिवसानिमित्त वंडकर यांचा सत्कार माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुले व डॉक्टर खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आला.


   या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष दगडूशेणवी, बबन बारदेसकर इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांमध्ये नामदेव भांदीगरे, राजू आमटे, दत्तामामा जाधव, मोहन कांबळे, बाजीराव चांदेकर ,अमर देवळे, अनिल बोटे,शंकर इंगवले के.डी मेंडके, विपुल अपराध ,भिकाजी कांबळे, सचिन मगदूम प्रमोद वंडकर ,मयूर सावर्डेकर ,बाजीराव जाधव ,जीवन भोसले, योगेश वंडकर, शुभम  वंडकर, इत्यादींचा समावेश होता.


   राजू चव्हाण यांनी स्वागत केले . प्रा. पृथ्वीराज कदम यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन अमोल एकल यांनी केले . बाळासाहेब मंडलिक यांनी आभार मानले.


             -----------------------