बाळू मामांच्या पांढरीत भोंदूगिरी चालू देणार नाही - कार्याध्यक्ष होडगे

Kolhapur news
By -

 

            


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


             बाळूमामांच्या पवित्र  पांढरीत बेरोजगार बुवा लोकांची भोंदूगिरी चालू देणार नाही असा परखड इशारा देवस्थानचे नूतन कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी दिला आहे.


     बाळूमामा हे लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचे कोणी वारसदार ,  शिष्यगण अथवा अनुयायी सुद्धा नाहीत.तरीही भाविकांच्या श्रद्धेचा गैर फायदा घेऊन कांहीजण भोंदूगिरी करत असल्याचे आढळून आले आहे. आपण मामांचे पट्टशिष्य किंवा वारसदार असल्याचे सांगून गरीब श्रद्धाळू भाविकांची फसवणूक करताना दिसतात.भाविकांमध्ये गैर समज पसरवून त्यांच्या कडून सेवा देणगी उकळण्याचा प्रयत्न केला जातो. 


ज्यांना श्रींची सेवा करायची असेल ते बकऱ्यांच्या तळावर जाऊन तेथे सेवादान करू शकतात.तरी भोंदूगिरी करणाऱ्यांपासून सावध रहावे असे आवाहन ट्रस्ट मार्फत करण्यात येत आहे.तसेच अशा फसव्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

  

या निवेदनाची भाविकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी अशी व्यवस्थापनांमार्फत विनंती करण्यात येत आहे.


                      --------------------