कोल्हापूर न्यूज नेटवर्क
आदमापूर येथील युवा कुस्तीगीर पवनराज विकास पाटील याने आपल्या अनेक कुस्त्यांचे मानधन एका गरजू विधवेच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिले.या विधवेचे नाव आहे श्रीमती राजश्री राजेंद्र पाटील.पती राजेंद्र पाटील यांच्या मृत्यूनंतर मुलांच्या पोषणाची व शिक्षणाची सर्व जबाबदारी श्रीमती राजश्री पाटील यांच्यावर पडली. पवनराजने दाखवलेल्या दानशूरपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पवनकुमार मुदाळ च्या प.बा.पाटील हायस्कूल मध्ये इयत्ता ८वीत शिकत आहे.त्याचे वडील उद्योजक असून समाजसेवेच्या कामातही सतत व्यस्त असतात.तसेच आजोबा कुंडलिक पाटील संत बाळूमामांचे भक्त आहेत.पवनने गारगोटी, कुरणी,म्हसवे,सावर्डे, कोनवडे, राशिवडे,घोडेश्वर,कुरुकली,इ. ठिकाणी कुस्त्या जिंकल्या होत्या.ते सर्व मानधन त्याने विधवा मातेच्या चरणी अर्पण केले.मागील वर्षी आदमापूर येथील प्राथमिक शाळेला सुद्धा त्याने बांधकामासाठी मानधन अर्पण केले होते.
सरपंच विजय गुरव,प्रकाश खापरे, अमर पाटील,विकास पाटील,राणादा,गणेश खेबुडे,स्वप्नील पाटील,इत्यादींच्या उपस्थितीत त्याचा सत्कार झाला.
----------------------