कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथे मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला.स्व.सदाशिवराव मंडलिक यांच्यावर प्रेम करणाऱ्या व त्यांना कायम साथ दिलेल्या मुरगूड शहर व परिसरातील जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
वरिष्ठ गटनेत्यांच्या अनुपस्थितीत चाचपणी साठी फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आल्याचे समजले, कार्यकर्त्यांमध्ये कितपत उत्साह आहे हे जाणून घेणे हेच या मेळाव्याचे उद्दिष्ट होते. मेळाव्यात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला.यांच्यातील काहींनी मनोगते व्यक्त केली.
मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुका दिवाळी नंतर लागतील.कांहीं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां सुद्धा लागण्याची शक्यता आहे. याबाबत कार्यकर्ते कितपत सज्ज आहेत हे पाहणे हे सुद्धा मेळाव्याचे उद्दिष्ट होते.
स्व.मंडलिक यांच्या फोटो पूजनाने मेळाव्याला सुरुवात झाली.अध्यक्षस्थानी अविनाश पाटील होते . माजी नगरसेवक शिवाजीराव चौगुले यांनी स्वागत केले. स्व.सदाशिवराव मंडलिक यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिली होती .त्यांच्या माध्यमातून गटाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधीचा निधी आणला होता. माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके,उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले,ॲड.रेखा भोसले,माजी प्राचार्य पी.व्ही .पाटील ,पी.एस.दरेकर यांनी आपापली मनोगते व्यक्त केली .सर्व सामान्य कार्यकर्त्यांनीच स्व.मंडलिक सर्वांना ताकद दिल्याने त्यांना यशाची शिखरे गाठता आली. साहेबांनी सुद्धा अगदी सामान्य कार्यकर्त्यांना बळ दिले.यापुढे येणारी आव्हाने स्वीकारायची तयारी ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यास माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर,माजी नगरसेवक सुहास खराडे,किरण गवाणकर, दत्ता मंडलिक,मारुती कांबळे,भगवान लोकरे,गणपतराव लोकरे, सर्जेराव पाटील,दीपक शिंदे,संभाजी आंगज, आर.डी.चौगुले,संजय भारमल,विजय सापळे,बी.एस.खामकर,नेताजी कळंद्रेआदी उपस्थित होते.
--------------------