आज मंडलिक गटाचा मुरगूड मध्ये मेळावा .ज्येष्ठांचा सत्कार.

Kolhapur news
By -

                 


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क

      

   

मुरगूड येथील दत्तप्रसाद हॉल मध्ये मंडलिक गटाचा मेळावा माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी संपन्न होणार आहे.माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले,नगरसेवक शिवाजीराव चौगुले इत्यादी या मेळाव्याचे निमंत्रक आहेत.मुरगूड सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हा जनसंपर्क मेळावा आयोजित केला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.


    स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या व्यक्तीमत्त्वाचा ,कार्य पद्धतीचा आणि लोकसंपर्काचा जबरदस्त करिष्मा आजही पहायला मिळतो.गल्ली ते दिल्ली आमचा साहेब एकच होता व त्यांच्या घराचे दरवाजे आम्हांला २४ तास उघडे असायचे असे कांहीं ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितले.  मंडलिक गटाचा प्रभाव तालुका व जिल्ह्यात असल्याचे कांहीं युवकांनी सांगितले.साहेबांचा जयघोष हे मेळाव्याचे आकर्षण होते.


   त्यांचा वारसा संजयदादा व विरेंद्र दादांनी चालवला आहे. त्यामुळे मुरगूड व पंचक्रोशीतून मंडलिक गटाचे अनुयायी दाखल होतील असा अंदाज बांधण्यात येत आहे. मेळाव्यात जुन्या जाणत्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात येणार असल्याचे व मेळाव्यानंतर भोजनाची सुद्धा सोय केली असल्याचे संयोजकांनी "कोल्हापूर न्यूज" ला सांगितले.


        --------------------------------