'वेस्ट इज वेल्थ' संकल्पना पाहून मुख्य कार्यकारी कार्तिकेयन एस भारावले

Kolhapur news
By -

 

         


   कोल्हापूर न्यूज / हेरले प्रतिनिधी 


          कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी विद्या मंदिर मौजे वडगाव या शाळेला भेट दिली. शाळेतील पर्यावरण स्नेही वातावरण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मेहनतीतून साकारलेला स्वच्छ सुंदर परिसर यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्यासोबत आलेला अधिकारी वर्ग देखील सुखावून गेले.


         झांज पथकाच्या तालात मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या टीमचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या टीमने चिमुकल्या विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला. टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना राबवत शाळेने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलेली साहित्य निर्मिती विशेष प्रभावित करून गेली.


          शाळेने विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेले स्वच्छतेचे मूल्य, कचरा व्यवस्थापन, विज्ञान कक्ष, सभागृह, औषधी वनस्पती पार्क, शाळेचे उज्वल क्रीडा परंपरा, इत्यादी बाबींचे निरीक्षण करून कौतुक केले.


        पक्ष्यांची शाळा अशी ख्याती असलेल्या विद्या मंदिर मौजे वडगाव शाळेत सीईओ  भेटीवेळी पक्षांनीही मोठ्या प्रमाणात सर्व टीमला दर्शन देऊन आश्चर्यचकित केले.  मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे यांच्या नेतृत्वाखाली आणि गटशिक्षणाधिकारी नलवडे, विस्ताराधिकारी जे . टी . पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने सीईओ यांच्या समोर उत्कृष्ट सादरीकरण केले.


         यावेळी हातकणंगले गटविकास अधिकारी डॉ .शबाना मोकाशी,  विस्तार अधिकारी ए . एस .कटारे , एन . आर . रामान्ना  सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्निल चौगुले, ग्रामपंचायत अधिकारी बी .एस . ढेंगे- पाटील , माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.पं. सदस्य सुनिल खारेपाटणे ,  सुरेश कांबरे, रघूनाथ गोराडे , अविनाश पाटील, प्रकाश कांबरे , यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


             -----------------------------