शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

Kolhapur news
By -

 



     नवी दिल्ली : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटीसाठी त्यांना जबाबदार धरत जंतर मंतर येथे ३६ दिवसांपासून आंदोलन सुरू होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय दुसरे काहीही आम्ही स्वीकारणार नाही, असे आंदोलकांनी म्हटले होते.धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःच्या पदावरून एक पत्र जारी करून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली.


    कॉकरोच जनता पार्टीने  प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने पोस्ट केले आहे, "कॉकरोच जिंकले.. लोकशाही जिंकली" प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा पक्ष गेल्या ३६ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तिथे उपोषण केले होते.


गेल्या एका महिन्यांपासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलं आहे. आज (२५ जुलै) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं बोललं जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे.



                -----------------