कोल्हापुरात Business Network International च्या कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद : स्थानिक उद्योगांच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक - शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे प्रतिपादन

Kolhapur news
By -

 



                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


नेटवर्किंग, विश्वासावर आधारित व्यावसायिक संबंध, उद्योजकता आणि स्थानिक उद्योगांच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे  प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समोरजित सिंह घाटगे यांनी केले. 


कोल्हापूर येथे आयोजित BNI (Business Network International) च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 


 समरजीतसिंह घाटगे पुढे म्हणाले , BNI ही जगातील अग्रगण्य व्यावसायिक नेटवर्किंग संस्था असून "Givers Gain®" या तत्त्वावर कार्य करते. एकमेकांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देत उद्योग, व्यापार आणि सेवाक्षेत्रातील उद्योजकांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे BNI चे वैशिष्ट्य असावे. तसेच अशा उपक्रमांमुळे उद्योजकता, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला


                     ---------------