कोल्हापूर न्यूज / वि .रा .भोसले
सोशल मीडिया वर खुप व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहिला.मोटर सायकल वर दोन छोटी मुले स्वार आहेत. एक मुलगा, एक मुलगी. आख्या भारतात आमिरखान आरटीओ चे नियम तंतोतंत पाळतो. दर 15 वर्षांनी मॉडेल बदलतो. या विडंबनातत फार मोठा संदेश दडला आहे. आमिरखान ने 3 हिंदू स्त्रीयांशी टप्प्या टप्प्याने लग्ने केली आहेत. त्याने कायदा पाळला सुद्धा असेल. एकीला घटफोट देऊन दुसरीशी लग्न. तो सेलिब्रेटी असल्याने गाजावाजा झाला. राज ठाकरे पण तिसऱ्या लग्नाला येणार होते म्हणे. म्हणजे सोन्याहून पिवळे.
याला काय म्हणायचे?
परवा कोल्हापूर जिल्ह्यात म्हाकवे गावात एक लव्ह जिहाद चे प्रकरण घडले. हिंदू कन्या जिहादीच्या जाळ्यात सापडली. गावकरी सावध झाले. त्यांनी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे तक्रार मोर्चा काढला.याला कारण जिहादी कागलचा होता. वास्तविक तक्रार पोलीस अधिक्षक किंवा तत्सम प्रशासकीय अधिकाऱ्याकडे किंवा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कडे करायला हवी होती.
मंत्री हसन मुश्रीफ हे मुस्लिम समाजाचे असल्याने टिकाकारांच्या भुवया उगीचच उंचावल्या.जिहादी मुस्लिमच असतो अशी एक ठाम समजूत झाली आहे. तसे कांही नाही. अनेक टोळभैरव या क्षेत्रात वावरत आहेत. मोबाईल वरील सोशल मीडियाने त्यांचे काम सोपे केले आहे. मुलीचे फोन नंबर मिळवणे, फोन करणे, मेसेज देणे, भेट वस्तू देणे, मोटर सायकलवर फिरवणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. आमिरखान त्यांचा हिरो ठरला आहे.
हिंदू मुलीच याला बळी पडतात हेच मोठे दुर्दैव आहे. याला कारण स्वातंत्र्याच्या नावावर चाललेला स्वैराचार हेच असावे. कौटुंबिक संस्कारांची पुडी बांधून गटारात फेकून द्यायची व भेटेल त्याच्याशी स्वैर मैत्री करायची हेच अशा मुलींचे काम असते. या मैत्रीला युरोपीयन नाव असते. बॉय फ्रेंड, गर्ल फ्रेंड.
याची पुढची स्टेप असते पवित्र प्रेम. डोंबलाच.
ना कसलं ध्येय ना कसलं करिअर.
वेळ निघून गेली की पालक जागे होतात. स्लीव्हलेस ब्लॉउज, मोकळे केस, ओठावर थापलेली लाली, मानेचे धनुष्य आणि डोळ्यांचे बाण ही या नखरेल पोरींची अस्त्रे. नटून थटून बाहेर पडणाऱ्या मुलीकडे पालक आधी कौतुकाने पाहातात. असं कांही घडलं की मग छाती बडवून घेतात. मग आमिरखान ना काय तोटा नसतो. ते कोपऱ्या कोपऱ्यावर भेटतील.मुस्लिम मुलींना धर्म बंधने घातली जातात. बुरखा आणि अंगभर वस्त्रे. फक्त डोळे उघडे. अगदी म्हाताऱ्या महिला सुद्धा ही बंधने पाळतात.
नेमक्या हिंदू पोरी मात्र आमिर खानांच्या गळाला लागतात.त्याला मंत्री तरी काय करणार?
म्हणून पालकांनो आत्ताच सावध व्हा.
लव्ह जिहादीला जात नसते. त्यांचे प्रेम म्हणजे फास असतो.
----------------

