पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज - लोकनियुक्त सरपंच एम .जी .पाटील : धुंदवडे येथे महादेव सहकार समूहाच्या वतीने वृक्षारोपण

Kolhapur news
By -

 

             


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन गावचे लोकनियुक्त सरपंच एम जी पाटील यांनी केले . ते धुंदवडे ता गगनबावडा येथील महादेव सहकार समूहाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते .शिक्षक बँकेचे संचालक व्हा .चेअरमन गजानन कांबळे प्रमुख उपस्थित होते .


   सरपंच पाटील म्हणाले, प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणारा वृक्ष आजही मानवी जीवन आणि समाजाच्या अस्तित्वात संदर्भात महत्वाची भूमिका बजावत आहे . वृक्ष केवळ आपले जीवन प्रभावित करतात असे नव्हे तर ते आपले अस्तित्व सुरक्षित ठेवतात यावेळी उमाजी पाटील , मारुती पाटील,दिनकर पाटील सयाजी पाटील ,उपस्थित होते .

       

      धुंदवडे ता . गगनबावडा येथे महादेव सहकार समूहाच्या वतीने वृक्षारोपण करताना लोकनियुक्त सरपंच एम .जी . पाटील, व मान्यवर .


               -------------------