राज्यात 78 हजार झाडे लावण्याचा एसटीचा संकल्प :मुरगूड बसस्थानकामध्ये वृक्षारोपण समारंभ संपन्न. स्थानक नियंत्रक बाबुराव परीट

Kolhapur news
By -

 

               


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मुरगूड येथील एसटी बस स्थानकाच्या आवारात वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला. आवाराच्या अवतीभवती किमान 100 झाडे लावण्याचा निर्धार येथील बस कर्मचाऱ्यांनी केला आहे. पत्रकार व नगरसेवक यांना पाचारण करून हा वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.


     बस स्थानक नियंत्रक बाबुराव परीट यांनी सांगितले की एसटीला 78 वर्षे पूर्ण झाली असून महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी राज्यात एकूण 78 हजार झाडे यावर्षी लावण्यात यावीत असे आवाहन महामंडळाच्या सर्व विभागांना केले आहे.


    यावेळी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक निवृत्त सामाजिक कार्यकर्ते बबन बारदेसस्कर, दिलीप घाटगे (स्थानक नियंत्रक )  पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव कानकेकर,वि. रा. भोसले,सागर सापळे,आमोल चौगले.भिकाजी कांबळे,विनायक मोरबाळे.शाळेचे विद्यार्थी व प्रवासी उपस्थित होते. 


स्वागत राजेंद्र चव्हाण (पत्रकार दै. बंधुता ) यांनी केले. आभार बाबुरावं परीट यांनी मानले.





                  --------------------