शिवा काशीद ने शिवाजी महाराजांसाठी दिलेले बलिदान इतिहास विसरू शकत नाही - सुहासिनी देवी पाटील.

Kolhapur news
By -

 

              


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      नरवीर शिवा काशिद यांचे बलिदान इतिहास कधी विसरू शकणार नाही असे प्रतिपादन मुरगूडच्या लोक नियुक्त नगराध्यक्षा सौ.सुहासिनी देवी प्र.पाटील यांनी केले.


     शिवाजी राजे पन्हाळगडावर असताना आदिलशाही सरदार सिद्धी जोहार यांने पन्हाळागडाला वेढा दिला होता. हा वेढा सहा महिने सुरू होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर पन्हाळगडावरून निसटून विशाळगड गाठण्याची योजना आखण्यात आली.


   या योजनेत प्रति शिवाजी बनलेले वीर शिवा काशीद यांना सिद्धी जोहरच्या छावणीत आपले बलिदान द्यावे लागले. याच मोहिमेत घोडखिंड किंवा सध्याची पावनखिंड येथे बाजीप्रभू देशपांडे यांना सुद्धा आपले बलिदान द्यावे लागले.


   मुरगूड येथे वीर शिवा काशिद च्या पुण्यतिथी निमित्त फोटो पूजन व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


   यावेळी माझी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके विद्यमान उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले नगरसेवक सुनील रणवरे वृक्ष मित्र प्रवीण सूर्यवंशी विनोद रणवरे नंदू करणारे ज्योतिराम रणवरे, प्रवीण रणवरे विलास रणवरे सचिन रणवरे शिवाजी रणवरे अनिल रणवरे नामदेव माने एकनाथ माने संभाजी माने प्रसाद कमळकर नितीन माने गुंडा माने, प्रदीप कमळकर, सचिन कोरे इत्यादी सह अनेक शिवभक्त नागरिक उपस्थित होते.


            -----------------------