चित्रपटांचे तंत्रशुद्ध शिक्षण गरजेचे - दिग्दर्शक जब्बार पटेल

Kolhapur news
By -

 

        






             कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


पडद्यामागच्या गोष्टी, तंत्र आणि तंत्रज्ञान यापेक्षा कथा किंवा कंटेंट महत्वाचा आहे असे प्रतिपादन  प्रख्यात दिग्दर्शक व चित्रपट अभ्यासक दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केले.


         शिवाजी विद्यापीठातील बी. ए. फिल्म मेकिंग विभागांतर्गत घेण्यात आलेल्या प्रख्यात दिग्दर्शक आणि चित्रपट अभ्यासक डॉ. जब्बार पटेल यांच्यासोबतचा मुक्त संवादात ते बोलत होते. विविध विभागांचे महत्व, चित्रपटांचे तंत्रशुद्ध शिक्षणाची गरज यावरही अगदी सहज-ओघवत्या भाषेत त्यांनी मार्गदर्शन केले. 


  मुंबई मध्ये आजही अस्तित्वात असलेला "कोल्हापूर स्कूल" हा शब्द आणि त्याला असलेले महत्व यावेळी त्यांनी अधोरेखित करत नजीकच्या काळात या युवा दिग्दर्शकांकडून या शब्दाला पूर्ववलय प्राप्त करून देण्याची आशा व्यक्त केली. साधारण दोन तास चाललेल्या या संवादातून या युवा दिग्दर्शकांनी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली. 


सदर कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी . शिर्के, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव तसेच परिसरातील चित्रपटसृष्टीत कार्यरत असणारे तंत्रज्ञ, दिग्दर्शक तसेच चित्रपटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


               -------------------