एक बॉय फ्रेंड आपल्या शाळकरी गर्लफ्रेंड ला चाकूच्या धाकाने किडनॅप करण्याचा प्रयत्न करत आहे.हे कांहीं बॉलीवूड चित्रपटाचे चित्रीकरण किंवा दृश्य नाही.अगदी भर वस्तीत घडलेली व बॉलीवूडला मागे टाकील अशी साताऱ्यात घडलेली घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाळेत जाणाऱ्या आपल्या मुली सुरक्षित आहेत का याचा गांभीर्यानी पालकांनी विचार करण्याची ही वेळ आहे.शाळा व संस्था चालकांनी सुद्धा याची गंभीर नोंद घेतली पाहिजे.साताऱ्यातील हिम्मतबाज नागरिकांच्या जमावाने त्या मुलीचे अक्षरशः प्राण वाचवले आहेत. सोशल मीडिया ला सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत कारण या घटनेचा व्हिडिओ घेऊन त्यातील गांभीर्य समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रेम नावाच्या भावनात्मक प्रतिक्रियेला असे विकृत स्वरूप येते तेंव्हा अशा विपरीत घटना घडत असतात हेच या व्हिडिओतून स्पष्ट होते.पालकांनी लगेच आपल्या पालकांना दोष न देता सावधानता बाळगावी असा संदेश यातून मिळतो.नागरिकांच्या या सतर्कतेला व बहाद्दुरीला एक सलाम.
-------------------------