राजघराण्याचे वैभव उशाशी असतांना उत्कर्षा राजे यांनी समाज सुधारणेचा वसा घेतलाय.

Kolhapur news
By -

 

         

        




       


      कोल्हापूर न्यूज  /  वि .रा.भोसले 


        राजघराण्याचे नुसते नाव जरी पाठीशी असलं तर काहींना स्वर्ग दोन बोटावर असल्यासारखं वाटतं .त्यांची ती आलिशान जीवन पद्धती त्यांना साद घालते आणि फाटक्या खिशाला न परवडणारे शौक ते करत असतात .कर्जबाजारी झाले तरी चालेल पण राजवैभवाच्या आठवणीना उगीचच गुदगुल्या करत राहणे यातच त्यांना मौज वाटते.पण उत्कर्षा राजे या उच्च शिक्षित युवतीने असले सर्व वैभव पाया खाली घालुन रंजल्या गांजल्या समाजाच्या उत्कर्षासाठी आपले आयुष्य पणाला लावले आहे. नावातच  उत्कर्ष असलेल्या उत्कर्षाराजे या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या घराण्याशी निगडीत असून स्वराज्याच्या विस्तारात त्यांचे घराणे बडोदा येथे  स्थित झाले. तेथील गायकवाड घराण्याबरोबर ते कार्यरत राहिले .त्यानंतर त्या महाराष्ट्रात आल्या.त्यांचे वडील जनरल सर्जन आहेत.त्यांच्या मातोश्री इंदिराराजे या एक विख्यात  विधीज्ञ (अँडव्होकेट ) आहेत.


 उत्कर्षा राजे  कोल्हापूरच्या रहिवासी असून सध्या  पुण्यात  स्वतःची  संस्था चालवत आहेत.ही संस्था सामाजिक आणि पर्यावरणीय परिणामांवर काम करते.देशातील 22 राज्यात हे काम सुरू आहे. त्या स्वत: इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत . तरीहि त्यांनी सामाजिक  उद्यमशीलता ( Social Enterprinership) शास्त्रात मास्टर्स डिग्री मिळवली आहे.


     एन जी ओ मार्फत समुदेशन, संशोधन आणि विकास यावर भर दिला जातो.यात प्रामुख्याने आदिवासी ,ग्रामीण कुटुंबे,झोपडपट्टीतील महिला यांच्या सबलीकरणावर भर दिला जातो.  याच एनजीओ मार्फत आता पर्यंत 10 हजार झाडे लावण्यात आली आहेत. 250 KW च्या सोलर सिस्टिम योजना, 300 हून अधिक बोअर वेल आणि शाळां मध्ये व टोलनाक्यावर 200 हून अधिक जलशुद्धीकरण (RO) योजना कार्यान्वित केल्या आहेत.गोंदियात विशेष प्रकल्प राबवून तेथील गोंड आणि बुरुड समाजाला प्रशिक्षण देऊन कांहीं कौशल्येही पुरवली.मार्केटिंग लिंकस सुद्धा पुरवल्या.गरीब ,गरजू महिलांसाठी हिंजवडी पुणे येथे Cloud Kitchen नावाची उद्यमशील योजना त्यांनी सुरू केली आहे.मुंबईच्या डबेवाल्या प्रमाणे या महिला 250 हून अधिक डबे पुरवतात.त्यात नोकरदार,व्यावसायिक व  विद्यार्थी  यांचा समावेश आहे. अन्न प्रदूषित होऊ नये म्हणून डब्यांची डिलिव्हरी सुद्धा ई वाहनातून होते. 


    नक्षली भागात सुध्दा त्यांच्या संस्थेने आपला मायेचा हात फिरवला आहे.भीमाशंकर  येथे शासनाच्या वन धन योजनेंतर्गत येथील कातकरी समाजाला वनौषधी लागवड करण्यात मदत केली.तो त्यांच्या उपजीविकेचा व्यवसाय असल्याने इतर लोकांना झाडे तोडण्यास सरकारने बंदी केली आहे.


  उत्कर्षाने त्यांना सांगितले की औषधी झाडे फक्त तोडू नका त्यांची लागवड सुधा करा.पुढच्या पिढ्या जगतील. एवढे विधायक कार्य एक उच्च शिक्षित महिला केवळ समाज सेवा म्हणून करू  शकते यावर विश्वास ही बसत नाही . त्यांच्या संस्थेचे नाव इंडिजिनो सोल्यूशन्स असे समर्पक आहे.महिलांना स्वावलंबी करून स्वाभिमानाने जगायला शिकवणे हे उत्कृषराजे यांचे एक स्वप्न आहे. स्त्रि म्हणजे "मूक ती"( अबोल अशी अबला ) नसून "मुक्ति" ची अधिकारी( सबला)आहे हे त्यांनी आपल्या समाज कार्यातून दाखवून दिले आहे . संस्थेचे  एक हजारहून अधिक फॉलॉवर्स आहेत. वातानुकूल खोल्यां मध्ये टीव्ही समोर आयुष्य  ढकलणाऱ्या उच्चभ्रू महिलांच्या डोळ्यात अंजन घालणारे असे कार्य उत्कर्षाराजे राजे पांढरे यांनी करून दाखवले आहे.


  कोल्हापूरकरांचा त्यांना त्रिवार सलाम.





         

               ---------------------------